दैनिक गोमन्तक
पोर्तुगीजांच्या आगमनाआधीपासून गोव्यातील कुणबी समाजाच्या स्त्रिया ही पारंपारिक साडी परिधान करतात, म्हणून या साडीला कुणबी साडी म्हणून ओळखले जाते.
गोव्यातील कुणबी आणि गावडा जमातींद्वारे हाताने विणलेली पारंपरिक सुती साडी आहे.
व्हिनेगार ,कांची आणि लोह धातूच्या मिश्रणापासून बनवलेल्या रंगाची ही पारंपारिक साडी आहे
पारंपारिकपणे ही साडी पल्लूशिवाय नेसली जाते
गोवा खादी आणि ग्रामोद्योगतर्फे या साडीची निर्मिती आणि विक्री केली जाते. याबरोबरच केरळ आणि कर्नाटकमध्येदेखील कुणबी साडीची विक्री केली जाते
अॅक्वा फिश फेस्टिव्हलच्या कुणबी साडी वेअर फॅशन शोमध्ये कुणबी साडीला मॉडर्न लूक देण्यात आला होता
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 2021 मध्ये कुणबी साडीला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गोवेकरांना आश्वासन दिले होते