Sameer Panditrao
भारतात गणेशोत्सव मोदकाशिवाय अपुरा आहे.
भारताबाहेर एका देशात मोदकासारखाच गोड पदार्थ तयार करतात, पण त्याला नाव मात्र वेगळे आहे.
श्रीलंकेत, भारतात "मोदक" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोड पदार्थाला कोझुकुकट्टई म्हणतात. त्याचा आकार मात्र किंचित वेगळा असतो.
हा गोड पदार्थ मोदकाप्रमाणे तांदळाच्या पिठापासून बनवला जातो. त्यात नारळ, गुळाचेच सारण असते.
श्रीलंकेच्या तमिळ समुदायासाठी कोझुकुकट्टईला सांस्कृतिक महत्त्व आहे.
जन्माच्या रीतिरिवाजांमध्ये, लग्न समारंभात आणि धार्मिक उत्सवांसाठी बनवले जाते.
संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी हा पदार्थ खाल्ला जातो.