Sameer Amunekar
सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांचा ताण, कोरडेपणा, डोळ्यांची जळजळ आणि दृष्टिदोष होऊ शकतो.
सतत वाकून मोबाईल वापरल्याने मान, खांदे व पाठीच्या स्नायूंवर ताण येतो.
मोबाईलमधून निघणारे ब्लू लाईट मेलाटोनिन हार्मोन कमी करते, त्यामुळे झोप नीट लागत नाही.
सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यास चिंता, नैराश्य, एकटेपणा व आत्मविश्वास कमी होतो.
मोबाईलवर बसून वेळ घालवताना शारीरिक हालचाल कमी होते, ज्यामुळे वजन वाढते व मधुमेहाचा धोका वाढतो.
स्क्रीनसमोर बसून दीर्घकाळ काम केल्याने रक्ताभिसरण कमी होते, कोलेस्ट्रॉल व ब्लड प्रेशर वाढते.
काही संशोधनानुसार मोबाईलमधील रेडिएशनमुळे दीर्घकालीन काळात मेंदूवर परिणाम होऊन कॅन्सरचा धोका संभवतो.