Akshata Chhatre
प्रत्येक महिलेला लांब, दाट आणि निरोगी केसांची इच्छा असते. मात्र, आजकालची धावपळ, चुकीच्या खाण्याच्या सवयी, प्रदूषण आणि रसायनयुक्त उत्पादनांचा वापर यामुळे केस कमकुवत होतात.
अशा वेळी महागडे ट्रीटमेंट्स किंवा केमिकल प्रॉडक्ट्स वापरूनही काही फरक पडत नाही, उलट केस आणखी खराब होतात.
म्हणूनच नैसर्गिक, घरगुती उपायच जास्त प्रभावी, सुरक्षित आणि टिकाऊ ठरतात.
अशाच एका घरगुती उपायासाठी तुम्हाला लागेल. एक वाटी नारळ तेल, एक टीस्पून मेथी दाणे, १०–१५ कढीपत्ता आणि एक मध्यम चिरलेला कांदा.
प्रथम नारळ तेल गरम करून त्यात मेथी, कढीपत्ता आणि कांदा घालून मंद आचेवर तेलाचा रंग गडद होईपर्यंत उकळा. थोडं गार झाल्यावर हे तेल गाळून काचेच्या बाटलीत साठवून ठेवा
हे तेल केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावून हलक्या हाताने मसाज करा, किमान २ तास ठेवा किंवा रात्रभर ठेवू शकता आणि नंतर सौम्य शाम्पूने धुवा