खोबरेल तेलात मिसळा '2 रुपयांचा' हा पदार्थ; केस गळती, सांधेदुखीही होईल गायब

Akshata Chhatre

खोबऱ्याचे तेल आणि कापूर

खोबऱ्याचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण केसांसाठी एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. या मिश्रणाचा नियमित वापर केल्यास तुम्ही महागड्या उत्पादनांवर होणारा खर्च आणि वेळ वाचवू शकता.

camphor in coconut oil|home remedy for hair | Dainik Gomantak

मजबूत मुळे

खोबऱ्याचे तेल केसांसाठी उत्तम पोषण पुरवते आणि त्यात कापूर मिसळल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. कापूर मिसळलेले तेल केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना घट्ट, मजबूत आणि चमकदार बनवते.

camphor in coconut oil|home remedy for hair | Dainik Gomantak

उवांवर उपाय

लहान मुलांच्या केसांमध्ये उवा झाल्यास कापूर मिसळलेले खोबऱ्याचे तेल सर्वोत्तम उपाय आहे. कापराच्या तीव्र वासामुळे उवा मरतात आणि त्याच्या जंतुनाशक गुणांमुळे उवा व त्यांचे अंडी नष्ट होण्यास मदत होते.

camphor in coconut oil|home remedy for hair | Dainik Gomantak

सर्दी-खोकला

खोबऱ्याचं तेल उष्णता प्रदान करते, तर कापूर थंडावा व सुगंधामुळे श्वसनमार्ग उघडण्यास मदत करतो. नाक बंद असल्यास किंवा हलक्या खोकल्यात, छातीवर हलकी मालिश करून हे मिश्रण लावल्यास त्वरित आराम मिळतो.

camphor in coconut oil|home remedy for hair | Dainik Gomantak

वेदना कमी

कापूर आणि खोबऱ्याचे तेल उष्णतेच्या गुणांनी परिपूर्ण असल्यामुळे संधिवात, मणक्याच्या किंवा स्नायूंवर हलकी मालिश केल्यास रक्तप्रवाह सुधारतो.

camphor in coconut oil|home remedy for hair | Dainik Gomantak

त्वचेसाठी गुणकारी

कापूरात जंतुनाशक गुणधर्म असतात, जे त्वचेवरील जळजळ, खाज किंवा लहान जखमा बऱ्या करण्यास मदत करतात. खोबऱ्याचे तेल त्वचेला पोषण देते आणि कोरडेपणा कमी करते.

camphor in coconut oil|home remedy for hair | Dainik Gomantak

मानसिक तणाव

कापूराचा सुगंध मानसिक तणाव कमी करतो आणि मन शांत ठेवतो. पाठीवर, छातीवर किंवा पायांवर हलकी मालिश केल्यास स्नायू सैल होतात. यामुळे थकवा कमी होतो, झोपेत सुधारणा होते आणि मानसिक आरोग्य टिकून राहते.

camphor in coconut oil|home remedy for hair | Dainik Gomantak

'ती' मोठी होताना... वडिलांनी मुलीला द्यायलाच हव्या 'या' महत्त्वाच्या शिकवणी!

आणखीन बघा