Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 28 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या चेंडूवर 5 धावांनी विजय मिळवला.
मात्र, याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कला एकही विकेट न मिळाल्याने त्याच्या एका विक्रमात खंड पडला.
स्टार्कसाठी हा वनडे वर्ल्डकपमधील 24 वा सामना होता. त्याने सर्वात आधी 2015 साली पहिला वर्ल्डकप सामना खेळला होता.
तेव्हापासून वर्ल्डकपच्या सलग 23 सामन्यात स्टार्कने कमीत कमी एक तरी विकेट घेतलीच आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये सलग 23 सामन्यात विकेट घेणारा तो पहिला आणि एकमेव गोलंदाज आहे.
मात्र, त्याची ही विकेट घेण्याची साखळी अखेर न्यूझीलंडविरुद्ध 24 वा वर्ल्डकपचा सामना खेळताना तुटली.
त्याला न्यूझीलंडविरुद्ध एकही विकेट घेता आली नाही. त्याने 9 षटके गोलंदाजी करताना 89 धावा दिल्या.
वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सलग डावात विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये स्टार्क अव्वल क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅकग्रा आहे.
मॅकग्राने 2003 आणि 2007 वर्ल्डकपमध्ये मिळून सलग 13 डावात किमान एकतरी विकेट घेतली होती.
स्टार्कने आत्तापर्यंत वनडे वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या 24 सामन्यात 18.37 षटकात 56 विकेट्स घेतल्या आहेत.
शोएब - सानिया पुन्हा दिसले एकत्र