Akshata Chhatre
आजकालच्या काळात डेटिंग ॲप्सवर आपला जोडीदार शोधण्याचे प्रमाण वाढले आहे. पण अनेक मुलांची तक्रार असते की, मुली त्यांच्याशी जास्त काळ बोलत नाहीत किंवा काही दिवसांतच बोलणं थांबवतात.
त्यांच्या प्रेमाची ‘नाव’ पैलतीरावर जाण्याआधीच बुडून जाते. यामागे काही विशिष्ट चुका कारणीभूत आहेत.
अनेक मुले डेटिंग ॲपवर बोलणे सुरू झाल्यावर लगेच मुलीचा नंबर मागतात. यामुळे तुम्ही हताश दिसू शकता आणि मुलींना ही घाई आवडत नाही.
"तुम्ही कुठे आहात?", "काय करत आहात?" असे प्रश्न वारंवार विचारल्याने तुमच्या आयुष्यात दुसरे काहीच नाही असे त्यांना वाटू शकते. कोणत्याही नात्यात योग्य स्पेस देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
बालिशपणे किंवा अजागळपणे वागणेही टाळावे. एकूणच, कोणत्याही नात्यात जागा, आदर आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो.
सुरुवातीच्या संवादातच त्यांच्या भूतकाळातील नातेसंबंधांबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल वारंवार चौकशी करणे चुकीचे आहे. यासाठी मुलींना वेळ देणे महत्त्वाचे आहे.
सतत फोटो मागण्याने मुलींना अस्वस्थ वाटते आणि त्या तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, तुम्ही जास्त चिकटआहात असे वाटल्यास मुलींना संवादात रस वाटत नाही.