Sameer Panditrao
गोवा हे भारतातील एक महत्वाचे पर्यटन ठिकाण आहे. पण प्रत्येकवेळी गोव्याला जाणे शक्य होत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात एक मिनी गोवा झाला आहे हे आपणास माहित आहे का?
कोल्हापुरात कोल्हापूर गोवा या आंबोली मार्गे जाणारया रस्त्यावर कागल हे शहर लागते.
कागल शहरात जयसिंगराव हा प्रसिद्ध तलाव आहे. इथल्या पाझर तलावाचा परिसर सुंदर आहे.
हा परिसर विकसित करून इथे बोटिंग, धबधबा, ग्रुप डान्स, लेझर शो अशा व्यवस्था केल्या आहेत.
या सौन्दर्यामुळे त्याला मिनी गोवा असे ओळखण्यात येते.
हा परिसर सकाळी नऊ ते रात्री दहा खुला असतो. बुकिंग करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.