Akshata Chhatre
प्रत्येक व्यक्तीला आपली त्वचा नेहमीच तेजस्वी, नितळ आणि डागरहित असावी असे वाटते. मात्र, आजकाल वाढते प्रदूषण, चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव आणि अव्यवस्थित जीवनशैलीमुळे त्वचेच्या समस्या वाढत आहेत.
त्यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स, सुरकुत्या, पिगमेंटेशन यांसारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी अनेकजण महागडी स्किनकेअर उत्पादने वापरतात
पण बहुतेक उत्पादने रसायनांनी भरलेली असल्यामुळे त्वचेला नुकसान पोहचवतात.
त्वचेला नैसर्गिकरीत्या सुंदर बनवण्यासाठी कच्चे दूध हा एक उत्तम पर्याय ठरतो. कारण दुधामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात
दुधातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला हलक्या पद्धतीने एक्सफोलिएट करते, मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा उजळ व मऊ बनवते.
कच्च्या दुधाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील दाहक-विरोधी गुणधर्म. त्यामुळे मुरुम, लालसरपणा, सनबर्न अशा समस्या कमी होतात. संवेदनशील त्वचेसाठी देखील कच्चे दूध सुरक्षित आहे.
त्वचेला अधिक पोषण देण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधात मध मिसळून फेस पॅक तयार करू शकता.