गोमन्तक डिजिटल टीम
मान्सूनोत्तर पावसाचा जोर सध्या मंदावला आहे.
थंडीऐवजी कमाल तापमानात वाढ होत आहे. राज्यात तापमानाचा पारा 34.5 अंशावर पोहोचला आहे.
दुपारी ऊन आणि पहाटे सौम्य थंडी असा अनुभव सध्या ऱाज्यात येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत असे. परंतु अजून थंडीची चाहूल दिसत नाही आहे.
घाटालगतच्या भागात आता बऱ्यापैकी थंडी जाणवत आहे. शहराच्या ठिकाणी सौम्य थंडीला सुरूवात झाली आहे. काही प्रमाणात धुकेही पडत आहे.
काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे.
हवामानातील बदलांमुळे अनेकांना सर्दी, खोकला, घसा खवखवणे, आदी समस्या जाणवत आहेत. हवामान बदलांचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.