Akshata Chhatre
आयुष्यात ब्रेकअपसारखी घटना घडते, तेव्हा मन आणि मेंदूचा जणू काही भुगा झाल्यासारखं वाटतं. अशावेळी सर्वात अवघड गोष्ट असते ती म्हणजे एक्स पार्टनरला मेसेज न करणे.
लक्षात ठेवा, असे केल्याने तुमच्या त्रासात फक्त भरच पडते.
जेव्हा तुम्हाला तुमच्या माजी जोडीदाराला मेसेज करावासा वाटेल, तेव्हा स्वतःला विचारा की तुम्ही पुन्हा तुमची मानसिक शांती गमावण्यास तयार आहात का?
कोणतेही नाते तेव्हाच चांगले काम करते, जेव्हा दोन्ही बाजूंनी समान प्रयत्न, भावना आणि स्पष्टता असते. जर तुम्हाला नातेसंबंध टिकवण्यासाठी सतत एकट्यानेच प्रयत्न करावे लागत असतील, तर हे नाते निरोगी नाही.
ज्या व्यक्तीला तुमची काळजी नाही, तिच्यावर तुमचा वेळ वाया घालवण्याचा काय अर्थ आहे? तुमची किंमत ओळखा.
जेव्हा तुम्हाला मेसेज करण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा तुमचा फोन थोडा वेळ बाजूला ठेवा. तुम्हाला रडावेसे वाटले तर रडा, पण मेसेज करू नका.
नातं संपल्यावर एक्स पार्टनरला मेसेज न पाठवणे, हे तुमच्या जीवनाला सुधारण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे