Akshata Chhatre
लग्न म्हणजे दोन व्यक्तींनी नुसतंच एकत्र राहणं नाही, तर त्या नात्यात दृढ विश्वास आणि समजूतदारपणा असणं आवश्यक असतं.
आचार्य चाणक्य यांनी कित्येक शतकांपूर्वीच वैवाहिक जीवनातील या गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. त्यांच्या मते, काही गोष्टी स्त्रियांनी आपल्या पतीला सांगणे टाळायला हवे, कारण त्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो
अनेकदा महिला आपल्या पतींना त्यांच्या माहेरच्या घराबद्दलच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी सांगतात. पण चाणक्यनीतीनुसार, ही सवय चुकीची आहे.
पती-पत्नीच्या नात्याचा पाया विश्वासावर असतो. जर पत्नीने खोटे बोलले आणि सत्य समोर आले, तर नात्यातील विश्वास निश्चितच तुटतो.
तुमच्या पतीची तुलना कधीही इतर कोणत्याही पुरुषाशी करू नका, मग तो मित्र असो, सहकारी असो किंवा नातेवाईक असो.
चाणक्य सांगतात की पत्नीने तिच्या वैयक्तिक बचतीबद्दल किंवा धर्मादाय देणग्यांविषयी पतीला पूर्णपणे माहिती देऊ नये.
प्रत्येक नात्यात चढ-उतार येतात, पण रागाच्या भरात पतीशी कठोर शब्द बोलल्याने नाते तुटू शकते.