Akshay Nirmale
मारियो मिरांडा यांचा जन्म 2 मे 1926 रोजी दमण येथे झाला. इतिहास या विषयातून ते पदवीधर झाले होते.
त्यांच्या कारकिर्दीची सुरवात जाहिरात स्टुडिओपासून झाली. द इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून सुरवात केली.
मिस निंबुपाणी, मिस फोन्सेका, बंडलदास, नेपोलियन, सेरिफिना, डोसावट्टलसामी ही त्यांची कॅरिकेचर प्रसिद्ध आहेत.
मिरांडा यांची व्यंग्यचित्रे द टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्ससह देशातील अनेक नामांकित वृत्तपत्रांमध्ये छापून आली आहेत. त्यांनी व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यासोबतही काम केले.
मॉरिशस आणि स्पेन सारख्या देशांनी त्यांना स्थानिक संस्कृती चितारण्यासाठी आमंत्रित केले होते.
निवृत्तीनंतर मिरांडा यांनी गोव्यातील लोटली येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहणे पसंत केले. गोवा पोस्ट विभागाने त्यांच्यावर पिक्चर पोस्ट कार्डदेखील जारी केले.
11 डिसेंबर 2011 रोजी मिरांडा यांचे निधन झाले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि 2012 मध्ये मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने गौरविले आहे.