गोव्यात शाळकरी मुलांनी फुलवला झेंडूचा मळा...

Kavya Powar

डिचोली, पिळगाव येथील आयडीयल हायस्कूलमध्ये झेंडू लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला असून, यंदा झेंडू फुलांचे पीक समाधानकारक आले आहे. 

Marigold Planting by Goan Students | Dainik Gomantak

पुस्तकी ज्ञानाच्या कक्षेबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाबद्धल माहिती आणि आवड निर्माण व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून आयडीयल हायस्कूलतर्फे वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

Marigold Planting by Goan Students | Dainik Gomantak

आतापर्यंत इको आणि विज्ञान क्लबच्या सहकार्याने आयडीयल हायस्कूलतर्फे भाजी आणि भातशेती प्रकल्प राबविण्यात आले आहेत. 

Marigold Planting by Goan Students | Dainik Gomantak

 हे प्रकल्प यशस्वी ठरल्यानंतर गेल्या वर्षीपासून हायस्कूलतर्फे झेंडू लागवडीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Marigold Planting by Goan Students | Dainik Gomantak

रिटेलर विषय आणि विज्ञान क्लबच्या सहकार्याने शाळेजवळील मोकळ्या जागेत विद्यार्थ्यांनी झेंडू फुलांचा मळा फुलविलेला आहे. डिचोलीच्या विभागीय कृषी खात्याकडून झेंडूची रोपे उपलब्ध करून देण्यात आली.

Marigold Planting by Goan Students | Dainik Gomantak

विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन झेंडू फुलांची लागवड केली. संतुलित हवामान त्यातच विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे यंदा झेंडू फुलांचा बहर समाधानकारक आला. दिवाळी झाली, तरी अजूनही या शाळेजवळील मळ्यात पिवळ्या-केसरी झेंडू फुलांचे दर्शन होत आहे.

Marigold Planting by Goan Students | Dainik Gomantak

झेंडू फुलांचा बहर पाहता विद्यार्थ्यांची मेहनत फळाला आली आहे. याकामी शिक्षकांचेही योगदान महत्त्वाचे ठरले आहे, असे शाळेचे अध्यक्ष रामचंद्र गर्दे आणि मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गावकर यांनी सांगितले.

Marigold Planting by Goan Students | Dainik Gomantak