Marathi Rangbhumi Din: गोष्ट जागतिक मराठी रंगभूमी दिनाची...

दैनिक गोमन्तक

दरवर्षी 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो.

Marathi Rangbhumi Din | Dainik Gomantak

विष्णूदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करुन मराठी नाट्यसृष्टीचा पाया तयार केला.

Marathi Rangbhumi Din | Dainik Gomantak

1943 साली या घटनेचे स्मरण म्हणून राज्यातील क्षेत्रातील सर्व नामवंत एकत्र आले होते.

Marathi Rangbhumi Din | Dainik Gomantak

अन् सांगली 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला होता.

Marathi Rangbhumi Din | Dainik Gomantak

याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापण्यात आली.

Marathi Rangbhumi Din | Dainik Gomantak

'या' महत्त्वाच्या क्षणी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगलीत समितीने ठराव करुन हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून जाहीर केला.

Marathi Rangbhumi Din | Dainik Gomantak

सांगलीची 'अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती' 1960 पासून रंगभूमीवर दीर्घकाळ सेवा करणाऱ्या कलाकाराला 'विष्णूदास भावे गौरवपदक' देऊन त्यांचा सन्मान करते.

Marathi Rangbhumi Din | Dainik Gomantak

चिंतामणराव पटवर्धनांनी दिलेल्या जागेवर विष्णूदास भावे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने नाट्यमंदिरात कोनशिला बसविण्यात आली आहे.

Marathi Rangbhumi Din | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak
येथे क्लिक करा