Pramod Yadav
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर मिरामार येथे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे.
स्मृतीस्थळाच्या ठिकाणी प्रवेश करताच समोर दिसते ती पद्मभूषण मनोहर पर्रीकर यांचा पूर्णाकृती पुतळा.
स्मृतीस्थळाच्या आतमध्ये प्रवेश करताच दोन्ही बाजुला पर्रीकरांचा जीवनप्रवास दाखवणारी विविध छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
समाधीस्थळाच्या जवळ साकारण्यात आलेला पर्रीकरांच्या चेहऱ्याची प्रतिमा उठावदार आणि आकर्षक दिसते.
स्मृतिस्थळाच्या दोन्ही बाजुला समाधीस्थळाकडे जाणारा मार्ग करण्यात आला आहे.
भाईंचा जीवनप्रवास दाखवणारी छायाचित्रे पाहिल्यानंतर तेथून समाधीस्थळाकडे जाता येते.
पर्रीकरांनी त्यांच्या कार्यकाळात देशपातळीवर संरक्षण मंत्री म्हणून तर आणि राज्यात मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली.
पर्रीकरांच्या या प्रवासाचा आढावा छायाचित्राच्या माध्यमातून या स्मृतिस्थळाच्या ठिकाणी घेण्यात आला आहे.
स्मृतिस्थळाचा परिसर रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाईमुळे उजळून निघतो.