दैनिक गोमन्तक
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा आज जन्मदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्याबद्दल काही हाटके गोष्टी सांगत आहोत.
पणजी विधानसभा मतदारसंघातून सलग चारवेळा ते निवडून आले. गोव्याच्या राजकारणात याआधी अशी किमया कोणत्याही अन्य नेत्याला साधता आली नव्हती.
देशातील पहिले आयआयटी पदवीधर मुख्यमंत्री हा बहुमान पर्रिकर यांना मिळाला.
मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रिकर पणजीतील शासकीय निवासस्थानी न राहता म्हापसा येथील वडलोपार्जित घरात राहायचे.
मनोहर पर्रिकर स्कूटीवरून मुख्यमंत्री कार्यालयात जायचे.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, सायबरएज योजना, सीएम रोजगार योजना या माध्यमातून पर्रिकर यांनी गोवेकरांच्या हृदयसिंहासनावर राज्य केलं.
इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात ११ रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळू लागलं. पर्रिकर यांच्या या निर्णयाची देशभरात चर्चा झाली.