Akshata Chhatre
आजकाल कमी वयातच केस पांढरे होणं ही एक सामान्य समस्या बनली आहे.
यामागे अनुवंशिकता, तणाव, प्रदूषण, चुकीचा आहार आणि रासायनिक प्रॉडक्ट्सचा वापर ही प्रमुख कारणं आहेत
या समस्येवर एक घरगुती आणि नैसर्गिक उपाय म्हणजे चहापाला आणि आवळ्याचा हेअर डाय.
चहापल्यामध्ये असलेले टॅनिन्स केसांना नैसर्गिक गडद रंग देतात आणि त्यातील अँटिऑक्सिडंट्स केस गळती कमी करतात.
आवळा हे केसांसाठी अमृतसारखा असून, त्यात जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. तो केसांना मजबुती देतो, चमक वाढवतो आणि अकाली पांढरे होणं थांबवतो.
अर्धा लिटर पाण्यात ३ चमचे चहापत्ती व २ चमचे आवळा पावडर टाका. हे मिश्रण मंद आचेवर उकळा आणि पाणी अर्धं होईपर्यंत आटवा. नंतर गाळून त्यात १ चमचा काळे तीळ पावडर मिसळा. हे मिश्रण थंड झाल्यावर केसांना मुळांपासून टोकांपर्यंत लावा. किमान २ तास राहू द्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास काही महिन्यांत केसांचा नैसर्गिक काळेपणा परत येतो.