Akshata Chhatre
चेहरा चमकदार करण्यासाठी बाजारातील रासायनिक क्रीम्स, सीरम आणि फेशियलवर पैसे खर्च करूनही हवा तसा परिणाम मिळत नाही?
तर आता आपल्या बजेटवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे.
टॅनिंग, डाग आणि निस्तेज त्वचेच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही घरगुती नैसर्गिक उपाय करू शकता.
हा नुस्खा तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि तो बनवण्यासाठी लागणारे साहित्य घरात सहज उपलब्ध आहे; पपई आणि बिया, दूध, ज्येष्ठमध पावडर.
पपई सोलून तिचे बी आणि थोडे गर वेगळे काढा. हे दोन्ही घटक दुधासोबत मिक्सरमध्ये टाकून जाडसर मिश्रण तयार करा. या मिश्रणात ज्येष्ठमध पावडर मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा.
फक्त १० मिनिटांसाठी हा लेप चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून किमान २ वेळा किंवा गरज वाटल्यास सलग ७ दिवस याचा वापर करा.
या नैसर्गिक लेपामुळे मेलास्मा पासून बचाव होतो, टॅनिंग आणि पिगमेंटेशन कमी होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.