Akshata Chhatre
आजकाल केस पातळ होणे, तुटणे, गळणे आणि रूक्षता येणे यासारख्या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत.
बाजारातील महागडे रासायनिक शैम्पू आणि कंडिशनर अनेकदा यावर प्रभावी ठरत नाहीत.
अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी घरीच नैसर्गिक घटकांपासून तेल तयार करू शकता.
हे घरगुती तेल स्कॅल्पला निरोगी ठेवते आणि केसांच्या मुळांना खोलवर पोषण देऊन त्यांना मजबूत करते.
नैसर्गिक तेलासाठी लागणारे घटक; खोबरेल तेल,कच्चा कांदा, मेथीचे दाणे, कढीपत्ता, रोझमेरीची पाने.
नारळ तेल वापरत असाल, तर डबल बॉयलर पद्धतीने एका भांड्यात तेल गरम करा. सामान्य खोबरेल तेल थेट पॅनमध्ये गरम करू शकता.
तेल चांगले गरम झाल्यावर वरील सर्व साहित्य त्यात टाका. मंद आचेवर ४०-४५ मिनिटे तेल उकळू द्या. गरम करणे थांबल्यावर त्यात व्हिटॅमिन-ई कॅप्सूल घाला. हे तेल रात्रभर किंवा केस धुण्यापूर्वी किमान २ तास लावा आणि त्यानंतर जेंटल शैम्पूने केस धुवा