Rahul sadolikar
दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आज 75 वा वाढदिवस...
महेश भट्ट यांचा संघर्षाची सुरूवात त्यांच्या घर सोडण्यापासून होते जेव्हा त्यांच्या आई शिरीनने त्यांना घराबाहेर काढले होत.
महेश भट्ट यांचे वडील कधीही त्यांच्यासोबत राहत नव्हते. त्याच्या आई-वडिलांचे लग्न झालेले नव्हते. वास्तविक महेश भट्ट यांचे वडील आधीच विवाहित होते. म्हणूनच त्यांनी कधीही महेशजींच्या आईला पत्नीचा दर्जा दिला नाही.
वडील महेशजींना आणि आईला केवळ आर्थिक आणि इतर गोष्टींद्वारे मदत करायचे. महेश भट्टही जगण्यासाठी शालेय काळात छोटी-मोठी नोकरी करून पैसे कमवत असत
महेश भट्ट यांचे वडील नानाभाई भट्ट हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते आणि त्यांच्या प्रभावामुळेच महेश भट्ट यांनीही हाच मार्ग निवडला. महेश भट्ट यांना चित्रपट पाहण्याची आवड होती. या छंदामुळेच त्यांची चित्रपटसृष्टीकडे वाटचाल झाली.