Varanasi Movie: बाहुबली, RRR नंतर आता 'वाराणसी', महेश बाबूच्या चित्रपटाचं बजेट चर्चेत; नेमकं आहे तरी किती?

Manish Jadhav

चित्रपटाचे नाव आणि घोषणा

एसएस राजामौली यांच्या आगामी 'ॲक्शन-ॲडव्हेंचर' चित्रपटाचे नाव 'वाराणसी' असे निश्चित झाले असून हैदराबादमधील 'ग्लोबट्रॉटर' या भव्य कार्यक्रमात हा 'फर्स्ट लूक' आणि टायटल लॉन्च करण्यात आले.

Varanasi Movie | Dainik Gomantak

महेश बाबूचा फर्स्ट लूक

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये महेश बाबू जखमी चेहरा, तीव्र नजर आणि हातात त्रिशूल घेतलेल्या नंदीवर स्वार झालेले दिसत आहेत. त्याच्या या शक्तिशाली आणि रौद्र रुपाला चाहत्यांनी मोठी पसंती दिली.

Varanasi Movie | Dainik Gomantak

सुपरस्टार्सची उपस्थिती

या लॉन्च इव्हेंटमध्ये सुपरस्टार महेश बाबू, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि चित्रपटातील खलनायक पृथ्वीराज सुकुमारन यांची विशेष उपस्थिती होती.

Varanasi Movie | Dainik Gomantak

पृथ्वीराज सुकुमारन

या चित्रपटात अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन एका शक्तिशाली खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. 'बाहुबली' आणि 'RRR' नंतर राजामौलींच्या चित्रपटात विलनची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे.

Varanasi Movie | Dainik Gomantak

प्रियांका चोप्राचा 'देसी' लूक

प्रियांका चोप्राने पांढऱ्या नेट साडीत आणि हेवी ज्वेलरीमध्ये 'देसी ग्लॅमरस' लूक साकारला, ज्यामुळे तिची उपस्थिती खास ठरली.

Varanasi Movie | Dainik Gomantak

चित्रपट दोन भागांमध्ये होणार

'वाराणसी' हा चित्रपट दोन भागांमध्ये बनवण्याची मेकर्सची योजना आहे. त्यामुळे चित्रपटाची कथा आणि व्याप्ती खूप मोठी असणार आहे.

Varanasi Movie | Dainik Gomantak

बिग बजेट

रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट तब्बल 1188 कोटी रुपये (जवळपास 12 अब्ज रुपये) या प्रचंड बजेटमध्ये तयार केला जात आहे. तो 120 देशांमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Varanasi Movie | Dainik Gomantak

Kuldeep Yadav: कुलदीप यादवचा धमाका, घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा डावखुरा गोलंदाज!

आणखी बघा