Pramod Yadav
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासोबत केंद्रीय मंत्री आणि खासदार श्रीपाद नाईक उपस्थित होते.
राज्याचे राज्यपाल पी.एस श्रीधरन पिल्लई यांनी देखील राजभवन येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केले.
पिल्लई यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी त्यांच्यासोबत राजभवनातील पदाधिकारी, कर्मचारी आणि राज्यपालांचे कुटुंबिय हजर होते.
राज्यात आज लाल बहादूर शास्त्री यांची जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली.