Akshata Chhatre
तुम्ही तुमच्या नात्याच्या भविष्याबद्दल गोंधळलेले आहात का? तुमचा संबंध किती काळ टिकेल, हे जाणून घ्यायचे आहे?
नात्यातील मोठे 'गुपित' रोजच्या छोट्या-छोट्या सवयींमध्ये दडलेले असते. या सवयी सांगतात की तुमचा पार्टनर तुम्हाला किती महत्त्व देतो आणि तुमच्या नात्याचे भविष्य काय आहे.
सगळं काही ठीक असताना सोबत असण्यापेक्षा, तणाव किंवा अपयशाच्या वेळी तुमचा पार्टनर तुम्हाला जज न करता आधार देतो का? खरा साथीदार अडचणीत साथ देतो.
मजबूत नात्यात अहंकार नसतो. तुमचा पार्टनर चूक झाल्यावर सहज 'सॉरी' म्हणतो आणि तुमच्या लहान मदतीसाठीही मनमोकळेपणे आभार मानतो का?
जेव्हा तुम्ही एकत्र असता, तेव्हा तुमचा पार्टनर किती वेळ फोनवर आणि किती वेळ तुम्हाला देतो? खरा पार्टनर नेहमी तुम्हाला प्राथमिकता देतो.
प्रेमाचा अर्थ फक्त आवडलेल्या गोष्टी नव्हे, तर तुमच्या नापसंतीचा आदर करणेही आहे. तो तुमच्या भावनांची कदर करतो का?
तुमचा पार्टनर भविष्याबद्दल बोलताना वारंवार "आपण" शब्दाचा वापर करतो का? जर तो तुम्हाला त्याच्या भविष्याचा अविभाज्य भाग मानत असेल, तर हे नातं नक्कीच मजबूत आहे.