Akshata Chhatre
वयानुसार त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचा लोंबकळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण जर ही लक्षणे ३०च्या आसपास दिसू लागली, तर सतर्क होण्याची गरज आहे.
अनेकदा लोक यावर महागड्या रासायनिक क्रीम्सचा वापर करतात.
आता तुम्ही कोणताही अतिरिक्त खर्च न करता शुद्ध आयुर्वेदाच्या मदतीने त्वचेची तारुण्यता टिकवून ठेवू शकता.
स्वयंपाकघरातील लवंग वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्याची त्वचा नैसर्गिकरित्या 'टाइट' करू शकता.
हा साधा उपाय दोन पद्धतीने करता येतो; एका डब्यात शुद्ध बदामाचे तेल घेऊन त्यात ६-७ लवंगा टाका आणि हा डबा ६-७ दिवस कडक उन्हात ठेवा.
रोज रात्री झोपण्यापूर्वी या तेलाचे काही थेंब चेहरा आणि मानेवर लावा. जर ऊन नसेल, तर तेलाचा डबा गरम पाण्यात ठेवून उष्णता द्या.
लवंगामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ते पिंपल्स कमी करते.
त्वचेतील रक्तप्रवाह सुधारते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणते.