Imran Khan यांची लव्हलाईफ! बॉलिवूड अभिनेत्रींशीही होते अफेअर

Pranali Kodre

इम्रान खान यांना अटक

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना रेंजर्सच्या मदतीने एनएबी म्हणजेच नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ते सध्या चर्चेत आहेत.

Imran Khan | Instagram

'क्रिकेटपटू' इम्रान खान

इम्रान खान हे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि विश्वविजेते कर्णधार आहेत.

Imran Khan | Twitter

लव्ह लाईफ चर्चेत

इम्रान मैदानातील कामगिरी आणि राजकिय कारकिर्दीव्यतिरिक्त त्यांच्या लव्हलाईफमुळेही मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले आहेत. त्यांचे काही बॉलिवूड अभिनेत्रींशीही अफेअर होते, असे अनेक रिपोर्ट्स सांगतात.

Imran Khan | Twitter

इम्रान यांचे मून मून सेन, शबाना आझमी यांच्याबरोबरही पूर्वी नाव जोडले गेले होते.

Moon Moon Sen | Twitter

काही रिपोर्ट्सनुसार इम्रान आणि रेखा यांनाही अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे. त्यामुळे त्यांच्याही अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या.

Rekha | Twitter

ऐंशीच्या दशकात इम्रान आणि बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांच्यातील अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. अनेक रिपोर्ट्सनुसार इम्रान यांनी २७ वा वाढदिवस झीनतबरोबर साजरा केला होता.

Zeenat Aman | Twitter

इम्रान यांचे पाकिस्तानच्या माजी प्रधानमंत्री बेनजीर भुट्टो यांच्याबरोबरही अफेअर असल्याचे म्हटले गेले. हे दोघेही ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेत असताना जवळ आल्याचे सांगितले जाते.

Benazir Bhutto | Instagram

पहिले लग्न

दरम्यान इम्रान यांनी 1995 साली जेमिमा खानबरोबर लग्न केले होते. त्यांना दोन मुलेही आहेत. पण 9 वर्षांनंतर हे दोघे वेगळे झाले.

Imran Khan - Jemima | Twitter

दुसरे लग्न

इम्रान यांनी 2015 मध्ये पत्रकार रेहम खानबरोबर दुसरे लग्न केले. पण त्यांचे नाते 10 महिनेच टिकले.

Imran Khan - Reham Khan | Twitter

तिसरे लग्न

इम्रान यांनी 2018 मध्ये बुशराबरोबर तिसरे लग्न केले. त्यांचे नाते अद्याप कायम आहे.

Iman Khan - Bushra Bibi | Twitter

सीता व्हाईटशी अफेअर

इम्रान खान यांचे सीता व्हाईटबरोबर देखील अफेअर होते. त्यांना एक मुलगीही झाली, जिचे नाव टेरियन व्हाईट आहे.

Iman Khan | Twitter
King Charles | Twitter