Akshata Chhatre
हल्ली वय वाढतंय की सौंदर्य कमी होतंय, हेच समजणं कठीण झालंय. अनेकदा वय अजून काहीच नाही, पण चेहरा मात्र वयस्कर दिसायला लागतो
चेहऱ्याची चमक कमी होते, त्वचा निस्तेज होते, सुरकुत्या उमटतात आणि आरशात पाहिलं की स्वतःचं प्रतिबिंबही अनोळखं वाटू लागतं.
आपल्या आजी-आईंच्या चेहऱ्यावर आजही नैसर्गिक तेज, एक सहज सौंदर्य दिसतं, मग आपल्यालाच का हा त्रास?
मुख्य कारण आहे बदललेली जीवनशैली, आहारातील कमतरता, ताणतणाव आणि पुरेशी झोप न घेणं. बाजारातील महागड्या क्रीम्स, सीरम्स यांचा उपयोग करूनही फारसा फरक पडत नाही.
पण याला एक घरगुती, नैसर्गिक आणि खूपच साधा उपाय आहे. चिया सीड्स त्वचेला ओलावा देतात, सूज कमी करतात आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्समुळे त्वचा लवचिक ठेवतात.
मनुका आयरन आणि अँटीऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतात; त्या चेहऱ्यावरील थकवा कमी करून ताजेपणा आणतात.
केशर प्राचीन काळापासून त्वचेला नैसर्गिक तेज देण्यासाठी ओळखलं जातं. लिंबू हा व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत; त्वचेला उजळ आणि निरोगी ठेवतो.