Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 302 धावांनी पराभूत केले.
या सामन्यात भारताकडून 3 चौकार आणि 6 षटकारांसह 56 चेंडूत 86 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मारलेला एक षटकार तब्बल 106 मीटर लांब गेला.
श्रेयस अय्यरचा हा षटकार वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठरला आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल असून त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 104 मीटर लांब षटकार मारला होता.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर देखील श्रेयस अय्यर असून त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 101 मीटरचा षटकार ठोकला होता.
तसेच वर्ल्डकप 2023 मध्ये चौथ्या क्रमांकावर संयुक्तरित्या ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल आहे.
डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध आणि डॅरिल मिचेलने भारताविरुद्ध प्रत्येकी 98 मीटरचे षटकार मारले आहेत.
त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर आहे. मिलरने नेदरलँड्सविरुद्ध 95 मीटरचा षटकार मारला आहे.