दैनिक गोमन्तक डिजिटल
गर्दीपासून सुटका.शनिवार आणि रविवारी लोणावळ्यात प्रचंड ट्रॅफिक आणि गर्दी असते. शांततेत निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान ट्रिप प्लॅन करा.
निसर्गाचा नजारा. तुमच्या लिस्टमध्ये राजमाची पॉईंट, भुशी डॅम, टायगर पॉईंट (लयन्स पॉईंट), लोणावळा लेक आणि कार्ला-भाजा लेण्यांचा समावेश नक्की करा.
खाद्यसंस्कृती. धुक्यामध्ये गरमागरम भाजलेलं कणीस (भुट्टा), कांदा भजी आणि लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की खाण्याचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका.
प्रवासाचे नियोजन.पावसाळ्यात घाट रस्ता आणि हायवेवर ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुणे किंवा मुंबईवरून लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करणे सोयीचे पडते.
सुरक्षितता पहिली.पावसाळ्यात निसरड्या वाटांमुळे अपघात होऊ शकतात. सेल्फी काढताना किंवा धबधब्यांच्या पाण्यात उतरताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा.
बॅगेची तयारी.ट्रिपला निघताना सोबत छत्री, चांगल्या क्वालिटीचा रेनकोट, मोबाईलसाठी वॉटरप्रूफ पाऊच आणि ट्रेकिंगसाठी पकड (ग्रिप) असलेले शूज सोबत ठेवा.
ऐतिहासिक सफर.जर तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल, तर लोणावळ्या जवळील लोहगड किंवा विसापूर किल्ल्याला भेट द्या. पावसाळ्यात हे किल्ले हिरवेगार आणि नयनरम्य दिसतात.
ॲडव्हान्स बुकिंग.पावसाळ्यात लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते, ज्यामुळे हॉटेल्सचे दर वाढतात. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी राहण्याची सोय आधीच ऑनलाईन बुक करून ठेवा.