नोवाक जोकोविचने जिंकलेल्या 24 ग्रँडस्लॅमची यादी

Pranali Kodre

नोवाक जोकोविच

सार्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने 10 सप्टेंबर रोजी अमेरिकन ओपन 2023 स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.

Novak Djokovic | Twitter

24 वे ग्रँडस्लॅम

जोकोविचने अंतिम सामन्यात डॅनिल मेदवेदेवला पराभूत करत हे विजेतेपद पटकावले. हे त्याचे कारकिर्दीतील 24 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले.

Novak Djokovic | Twitter

चौथे अमेरिकन ओपन विजेतेपद

तसेच जोकोविचचे हे चौथे अमेरिकन ओपन स्पर्धेतील विजेतेपद आहे.

Novak Djokovic | Twitter

अमेरिकन ओपन

साल 2023 पूर्वी जोकोविचने 2011, 2015 आणि 2018 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

Novak Djokovic | Twitter

24 ग्रँडस्लॅम

जोकोविचने 4 अमेरिकन ओपनशिवाय 10 ऑस्ट्रेलियन ओपन, 3 फ्रेंच ओपन आणि 7 विम्बल्डन अशी मिळून एकूण 24 ग्रँडस्लॅम विजेतीपदे जिंकली आहेत.

Novak Djokovic | Twitter

ऑस्ट्रेलियन ओपन

जोकोविचने 2008, 2011, 2012, 2013, 2015, 2016, 2019, 2020, 2021, 2023 या दहा वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

Novak Djokovic | Twitter

विम्बल्डन

तसेच जोकोविचने 2011, 2014, 2015, 2018, 2019, 2021, 2022 या सात वर्षी विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

Novak Djokovic | Twitter

फ्रेंच ओपन

जोकोविचने 2016, 2021 आणि 2023 असे तीन वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे.

Novak Djokovic | Twitter
Novak Djokovic | Dainik Gomantak