Akshata Chhatre
सध्या हवामानात सतत बदल होत आहेत. अचानक पडणारा पाऊस आणि त्यानंतर येणाऱ्या कडक उन्हामुळे आपल्या आरोग्यासोबतच त्वचेवरही वाईट परिणाम होतो.
या बदलांमुळे अनेकदा ओठ कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात.
ओठांची त्वचा इतर भागांपेक्षा खूपच मऊ आणि नाजूक असल्यामुळे थोडासा निष्काळजीपणाही ओठांचे सौंदर्य हिरावून घेऊ शकतो. पण काळजी करू नका, यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या उत्पादनांची गरज नाही.
कोरड्या आणि निर्जीव ओठांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मध आणि लिंबू वापरू शकता. यासाठी एक चमचा लिंबाच्या रसामध्ये मधाचे काही थेंब मिसळा आणि ओठांवर लावा.
मऊ ओठांसाठी तुम्ही एपल सायडर व्हिनेगरची मदत घेऊ शकता. त्याचे काही थेंब थोडेसे पाण्यात मिसळा आणि कापसाच्या मदतीने ओठांवर लावा.
बीट देखील ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरते. बीटचा रस काढून त्यात पुदिन्याची काही पाने आणि बदामाच्या तेलाचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण ओठांवर लावून १५ मिनिटांनी पाण्याने धुवा.
रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने ओठांना मसाज करणे खूप फायदेशीर आहे. बदामाचे तेल ओठांवरील पिग्मेंटेशनची समस्या दूर करते आणि त्यांना चमक आणते.