Pranali Kodre
फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धा अर्जेंटिनाने जिंकली आणि लिओनल मेस्सीचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न पूर्ण झाले.
अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभूत केल्यानंतर मेस्सीने त्याची पत्नी एंटोनेला रोकुजो आणि त्याच्या तीन मुलांबरोबर विश्वविजयाचा आनंद साजरा केला होता.
मेस्सी आणि एंटोनेला यांची लव्हस्टोरी खूप खास आहेत.
मेस्सी आणि एंटोनेला लहानपणीचे मित्र आहेत. एंटोनेला ही मेस्सीच्या मित्राची चूलत बहीण आहे. त्यामुळे ते लहान असल्यापासून एकमेकांना ओळखत होते.
पुढे मेस्सी फुटबॉल खेळण्यासाठी 13 व्या वर्षीच अर्जेंटिनाच्या रोसारियोमधून बार्सिलोनाला आला. त्यामुळे त्यांची सातत्याने भेट झाली नाही.
मात्र, 2005 मध्ये एंटोनेलाची जवळची मैत्रीणीने कार अपघातात निधन झाले. ते ऐकून मेस्सी एंटोनेलाच्या जवळ आला, त्याने तिला सांभाळले.
त्यानंतर मेस्सी आणि एंटोनेला यांच्यातील मैत्रीचे रुपांतर हळुहळू प्रेमात झाले. त्यांनी 2009 मध्ये त्यांच्या नात्याची कबुली दिली,
साल 2012 मध्ये त्यांना पहिला मुलगाही झाला. त्यानंतर 2017 मध्ये मेस्सी आणि एंटोनेलाने लग्न केले.
आज ते सुखी संसार करत असून त्यांना थियागो, मतेओ आणि सिरो नावाची तीन मुलेही आहेत.