मेस्सी आठव्यांदा Ballon d'Or चा मानकरी

Pranali Kodre

बॅलन डी'ओर पुरस्कार सोहळा

पॅरिसला 30 ऑक्टोबर रोजी 67 वा बॅलन डी'ओर पुरस्कार सोहळा पार पडला.

Ballon d'Or | X/ballondor

मेस्सीने जिंकला पुरस्कार

या सोहळ्यात अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने मानाचा बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला.

Lionel Messi | X

आठव्यांदा मेस्सीला पुरस्कार

विक्रमी आठव्यांदा त्याच्या नावाची मोहोर या पुरस्कारावर उमटली आहे.

Lionel Messi | X/ballondor

एर्लिंग हालंडला टाकलं मागे

मेस्सीने एर्लिंग हालंडला मागे टाकत बॅलन डी'ओर 2023 पुरस्कार जिंकला आहे. पुरस्कारासाठीच्या मतदानात नॉर्वेचा हालंड दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

Lionel Messi

मेस्सीचे बॅलन डी'ओर

मेस्सीने यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012,2015, 2019 आणि 2021 साली हा प्रतिष्ठीत बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला होता.

Lionel Messi | X

एकमेव मेस्सी

मेस्सीव्यतिरिक्त कोणालाही 8 वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकता आलेला नाही.

Lionel Messi | X/ballondor

ख्रिस्तियानो रोनाल्डो

मेस्सीनंतर 5 वेळा ख्रिस्तियानो रोनाल्डोने हा पुरस्कार जिंकला आहे.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

मॅराडोनासाठी...

दरम्यान,मेस्सीने हा पुरस्कार दिग्गज दिएगो मॅराडोना यांनाही समर्पित केला.

Lionel Messi

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक सलग विजय मिळवणारे 5 भारतीय कर्णधार

Virat Kohli - Rohit Sharma