Pranali Kodre
फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू लिओनल मेस्सी 24 जूनला त्याचा वाढदिवस साजरा करतो.
18 डिसेंबर 2022 रोजी मेस्सीच्या नेतृत्वातील अर्जेंटिना संघाने फ्रान्सला पराभूत करत फिफा वर्ल्डकपवर नाव कोरले होते. या वर्ल्डकपमध्ये मेस्सीने 7 गोल आणि 3 असिस्ट केले.
वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली एफसी ग्रँडोलीमधून फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मेस्सीने नंतर नेवेल्स ओल्ड बॉयसाठी लहानपणी बराच काळ फुटबॉल खेळले.
मेस्सी वयाच्या 13 व्या वर्षी तो बार्सिलोनाला गेला. त्याला ग्रोथ डेफिशियन्सी आजार होता. पण त्याच्यातील कौशल्य पाहून बार्सिलोनाने त्याच्या उपचाराचा सर्व खर्च उचलला.
मेस्सीने बार्सिलोनाच्या वरिष्ठ संघाकडून 2004 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. मेस्सीने त्याचवर्षी 20 वर्षांखालील संघाकडून अर्जेंटिनासाठीही पदार्पण केले.
मेस्सीने मेस्सीने अर्जेंटिनासाठी 2022 वर्ल्डकप जिंकण्यापूर्वी 2005 मध्ये 20 वर्षांखालील वर्ल्डकप, 2008 मध्ये बिजिंगला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक 2021 मध्ये कोपा अमेरिका ही स्पर्धाही जिंकल्या आहेत.
मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक 7 वेळा मानाचा बॅलन डी'ओर पुरस्कारही जिंकला. आत्तापर्यंत कोणत्याही खेळाडूला 7 वेळा हा पुरस्कार जिंकता आलेला नाही.
मेस्सीने दोन वेळा गोल्डन बॉल जिंकलाय, फिफाचा दोन वेळा सर्वोत्तम खेळाडू ठरला, त्याने सहा वेळा युरोपियन गोल्डन शुज आपल्या नावे केला. तसेच तो ला लीगामधील 9 वेळा व्हॅल्युएबल खेळाडू ठरला, तर दोन वेळा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूही ठरला.
मेस्सीने बार्सिलोनासाठी 10 वेळा ला लीगा, 4 वेळा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी, 7 वेळा कोपा डेल रे, 8 वेळा सुपरकोपा डी एस्पाना, 3 क्लब वर्ल्डकप आणि 3 युरोपियन सुपर कप या स्पर्धांचे विजेतेपद जिंकले.
मेस्सी 17 वर्षे बार्सिलोनाकडून खेळल्यानंतर 2021 मध्ये पॅरिस-सेंट जर्मेन संघात सामील झाला. या क्लबकडून त्याने फ्रेंच सुपर कप आणि लीग 1 चे विजेतेपद जिंकले. आता मेस्सी इंटर मियामी क्लबकडून खेळताना दिसणार आहे.
मेस्सीने अर्जेंटिनासाठी आत्तापर्यंत (24 जून 2023) पर्यंत 103 गोल केले आहेत. तसेच त्याने क्लब कारकिर्दीत त्याने 700 पेक्षा अधिक गोल केले आहेत.