Goa Travel Tips: पहिल्यांदा गोवा ट्रीप प्लॅन करताय? 'हे' 4 बेस्ट बीचेस नक्की पाहा

Manish Jadhav

गोवा

गोवा म्हटलं की येथील सुंदर समुद्रकिनारे, नाइटलाइफ, कसिनो आणि बरचं काही आठवतं. गोव्याला जाणारा पर्यटक आवर्जून इथले प्रसिद्ध समुद्रकिनारे पाहतो.

Goa Beaches | Dainik Gomantak

बेस्ट समुद्रकिनारे

गोव्याला तुम्ही पहिल्यांदा जात असाल आम्ही तुम्हाला इथल्या काही बेस्ट बीचेसबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

Goa Beaches | Dainik Gomantak

1. टर्टल बीच

गोवाच्या उत्तरेकडे असलेला मोरजीचा समुद्रकिनारा 'टर्टल बीच' म्हणून ओळखला जातो. इथलं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला मोहीनी घालतं. जेट स्की, स्पीड बोट, बनाना राईड या वॉटरस्पोर्टचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

Morjim Beach | Dainik Gomantak

2. बागा बीच

बागा हे गोव्यातील सर्वात व्यस्त बीच आहे. समुद्रकिनारी पार्ट्या, स्वादिष्ट पाककृती आणि नेत्रदीपक नाइटलाइफसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण मित्रांसोबत भेट देण्यासाठी योग्य आहे.

Baga Beach | Dainik Gomantak

3. कांदोळी बीच

कांदोळी बीच हा अग्वाद किल्ल्यापासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे. हा समुद्रकिनारा तुलनेने कमी गर्दीचा आहे जो मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटकांना आकर्षित करतो. नाइटलाइफ आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी ही समुद्रकिनारा ओळखला जातो.

Candolim Beach | Dainik Gomantak

4. सिक्वेरी बीच

सोनेरी वाळूने मंत्रमुग्ध करणारा सिक्वेरी हा गोव्यातील एक वेगळा समुद्र किनारा आहे. जो त्याच्या प्राकृतिक सौंदर्य आणि स्थापत्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करत असाल तर हा गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनारा आहे.

Sinquerim Beach | Dainik Gomantak
आणखी बघा