दैनिक गोमन्तक
आवळ्याचे गुणधर्म काय हे तुम्हाला माहितच असेल, पण आवळ्याच्या बियाही तेवढ्याच फायदेशीर असतात.
आवळ्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे केस, डोळे आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.
हिवाळ्यात लोक आवळा खातात आणि बऱ्याचवेळा आवळा खाल्ल्यानंतर त्याची बी फेकून देतात.
आवळ्याची बी बारीक करुन त्याची पेस्ट डोळ्यांवर लावल्याने डोळ्यांना खाज येणे, जळजळ होणे यासारख्या समस्या दूर होतात.
जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर तुम्ही आवळा पावडरचे सेवन केल्याने यापासून आराम मिळेल.
ल्युकोरियाच्या समस्येवर आवळ्याच्या 3 बिया बारीक करुन एक ग्लास पाण्यात मिसळून त्यात 1 चमचा मध आणि थोडी साखर टाकून प्या.
नाकातून रक्त येत असल्यावर आवळ्याचा बिया तुपात तळून बारीक करा आणि त्याची पेस्ट कपाळावर लावावी.