Astro Tips: तुळशीचे पानं तोडण्याचे नियम

दैनिक गोमन्तक

तुळशी म्हणजे देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते, त्यामळे सकाळी आंघोळ केल्याशिवाय तुळशीला हात लावू नये किंवा तोडू नये.

Tulas | Dainik Gomantak

जसे आपण सर्वात आधी देवाला नमस्कार करतो, तसेच तुळशीला नमस्कार केल्यावरच तुळशीचे पानं तोडावी.

Tulas | Dainik Gomantak

तुळशीची पानं कधीही सकाळी किंवा दिवसा तोडून घ्या, सूर्यमावळल्यानंतर पानं तोडल्याने अशुभ मानले जाते.

Tulas | Dainik Gomantak

शास्त्रानुसार असे मानले जाते की, रविवार, एकादशी, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण असतांना तुळशीची पाने तोडू नये.

Tulas | Dainik Gomantak

रविवार, एकादशी अशा दिवशी तुळशीला पाणीही टाकू नये.

Tulas | Dainik Gomantak

तुळशीला फक्त सकाळी पाणी टाकावे, आणि संध्याकाळी दिवा लावूनच प्रदक्षिणा करावी असा नियम आहे.

Tulas | Dainik Gomantak

अनेकदा घरातील सदस्य एक एक करुन तुळशीला कलशाने पाणी अर्पण करतात, पण जास्त पाणी टाकल्याने तुळस सुकते.

Tulas | Dainik Gomantak

तुळशीचे रोप कधीही आग्नेय दिशेला ठेवू नका, कारण ही दिशा अग्नीची दिशा मानली जाते.

Tulas | Dainik Gomantak

कधीही तुळशीची वाळलेली पाने जमिनीवर पडतात, तर ती धुवून रोपातच टाकावीत.

Tulas | Dainik Gomantak

त्यामुळे त्यांच्यावर कधीही पाय पडत नाही किंवा पाने इकडे-तिकडे टाकली जात नाही आणि तुळशीचा अपमानही होत नाही.

Tulas | Dainik Gomantak
Dainik Gomantak