Akshata Chhatre
मुघल साम्राज्यातील हरम हा नेहमीच इतिहासकारांसाठी कुतूहलाचा विषय राहिला आहे. बाबरने याची सुरुवात केली असली तरी त्याला वैभवशाली रूप देण्याचे काम सम्राट अकबरने केले
अकबराच्या कारकिर्दीत या हरममध्ये पाच हजारांहून अधिक स्त्रिया राहत असत. त्यात राण्या, उपपत्नी, दास्या आणि महिला कामगारांचा समावेश होता
अरबी भाषेत हरम म्हणजे पवित्र स्थळ, जिथे फक्त बादशहालाच प्रवेशाची परवानगी असे. लेखन प्राणनाथ चोप्रा आपल्या ‘सम आस्पेक्ट ऑफ सोशल लाईफ ड्युरिंग द मुघल एज’ या ग्रंथात लिहितात की हरममध्ये वेगवेगळ्या धर्म-समुदायांच्या स्त्रिया राहत असत.
इथल्या स्त्रियांच्या पगारासाठी प्रचंड संपत्ती लागे. त्या काळात उच्च पदावरील स्त्रीला महिन्याला तब्बल १६०० रुपये पगार मिळत असे, जेव्हा १ तोळा सोने फक्त १० रुपयांत मिळत होते.
हरमची देखरेख करणाऱ्या दरोगा महिलेला इतके वेतन मिळत असे की ती महिन्याला किलोभर सोने खरेदी करू शकत होती. त्या काळात ५ रुपयांत एखाद्या कुटुंबाचा महिनाभराचा खर्च भागत असे.
आकर्षक पगार आणि मौल्यवान नजराणे पाहून अनेक स्त्रिया हरमचा भाग होण्यासाठी प्रयत्न करत, पण प्रवेशाची अट कठोर होती; ईमादारी आणि पूर्ण पर्देदारी.
इतिहासकार सांगतात की, या स्त्रियांना योग्य वेतन मिळे आणि जर त्यांनी आपल्या कामाने बादशहा किंवा राणीला खूश केले तर त्यांना सोन्या-चांदीचे दागिने, अशर्फ्या आणि मौल्यवान भेटवस्तू मिळत असत.