दैनिक गोमन्तक
जेवणाची चव वाढवणारे लिंबू प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. अनेक दशकांपासून लिंबू अनेक प्रकारे वापरला जात आहे.
कॉफी आणि चहा पिण्यापेक्षा सकाळी लवकर लिंबू पाणी पिणे चांगले. यामुळे त्वचा आणि पचनक्रिया निरोगी राहते.
अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. लिंबू पाणी प्यायल्याने या समस्येपासून सुटका मिळते. लिंबूमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
एक कप लिंबूपाण्यात 94 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी हा आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी एक चांगला स्रोत आहे.
लिंबू पाणी वजन कमी करते, दिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने करावी. तुम्ही ते दिवसातून किमान दोनदा प्या. त्यामुळे भूक कमी लागते आणि पचनक्रिया बरोबर राहते.
जर तुम्हाला हाय ब्लड शुगरची समस्या असेल तर लिंबू पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. लिंबू पाणी प्यायल्याने मधुमेहाची समस्या दूर राहते.
कोमट लिंबू पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळते. त्वचेवर डाग पडणे, पुरळ येणे यासारख्या समस्या असतील तर त्यापासूनही सुटका मिळते.
प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजे समृद्ध लिंबूचे फायदे अगणित आहेत.