Kavya Powar
चंद्रग्रहण ही एक अशी घटना आहे, ज्याला विज्ञानापासून धर्म आणि ज्योतिषशास्त्रापर्यंत खूप महत्त्व आहे
2023 मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दिसणार आहे.
चंद्रग्रहण काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे टाळावीत?
ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की ग्रहण काळात नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. अशा स्थितीत या काळात अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये.
चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. असे मानले जाते की याचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
ग्रहण काळात झोपणे देखील शास्त्रात निषिद्ध आहे. असे करणे अशुभ मानले जाते.
चंद्रग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्र किंवा प्रमुख देवतेच्या मंत्राचा जप करणे शुभ असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
ग्रहण संपल्यानंतर शिवलिंगाला जल अर्पण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. यामुळे चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम होत नाही.