Pranali Kodre
श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएल 2024 सिजनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
मलिंगा आता मुंबई इंडियन्समध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. गेली 9 वर्षी ही जबाबदारी शेन बाँड सांभाळत होता.
त्यामुळे ही लसिथ मलिंगाची मुंबई इंडियन्स संघात घरवापसी समजली जात आहे.
मलिंगा मुंबई इंडियन्सकडून यापूर्वी आयपीएल खेळला असून त्याने संघाला 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटाही उचलला आहे.
मलिंगाने 2018 च्या आयपीएल सिजनमध्ये मुंबई इंडियन्सचा मेंटोर म्हणूनही काम पाहिले होते, पण नंतर तो 2019 मध्ये पुन्हा खेळाडू म्हणून खेळला.
दरम्यान, मलिंगा 2021 नंतर राजस्थान रॉयल्सच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनला. तिथे दोन वर्षे जबाबदारी त्याने सांभाळली.
आता मलिंगा आयपीएल 2024 पूर्वी पुन्हा मुंबई इंडियन्स संघात परतल्याने चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे.
त्यामुळे आता आयपीएल 2024 मध्ये पुन्हा एकदा रोहित शर्मा, कायरन पोलार्ड आणि लसिथ मलिंगा हे मुंबई इंडियन्सचे त्रिकूट पुन्हा पाहायला मिळणार आहे.
रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, तर पोलार्ड फलंदाजी प्रशिक्षक आहे.