Kavya Powar
प्रत्येक व्यक्तीला दररोज पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असते.
बदलत्या जीवनशैलीमुळे अवेळी जेवण अन् रात्री उशिरापर्यंत जागरणाचे प्रमाण वाढले आहे.
आरोग्यासाठी किमान सात तासांची झोप घेणे आवश्यक असते.
ही झोप सलग असली पाहिजे.
झोपेमध्ये खंड पडला तर शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही.
अनेकांना रात्री जागरण करण्याची सवय असते.
ही सवय कालांतराने आरोग्यासाठी घातक ठरु शकते.