Akshata Chhatre
आरशासमोर उभे राहिल्यावर प्रत्येकालाच आपली त्वचा निरोगी, तेजस्वी आणि काचेसारखी चमकदार दिसावी असे वाटते.
आजकाल कोरियन स्किनकेअरचे जे ट्रेंड्स आहेत, तशी त्वचा मिळवणे आता महागड्या उत्पादनांशिवायही शक्य आहे.
तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्येच निसर्गाने त्वचेला ग्लो देण्याचे रहस्य लपवले आहे.
तांदळाचे पीठ, कोरफडीचे जेल आणि गुलाबपाणी; या तीन साध्या घटकांचा योग्य वापर केल्यास तुमच्या त्वचेतील मृत पेशी, टॅनिंग आणि घाण खोलवर स्वच्छ होते.
तांदळाच्या पिठाचा स्क्रब ब्लॅकहेड्स कमी करतो, तर कोरफड त्वचेला थंडावा आणि आर्द्रता देते.
आठवड्यातून फक्त दोनदा हा सोपा, तीन-टप्प्यांचा घरगुती फेसियल करा.
काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणि उजळपणा अनुभवा.