Sameer Amunekar
हो, K-Beauty मधील अनेक उत्पादने भारतीय त्वचेलाही फायदेशीर ठरू शकतात. मात्र त्वचेचा प्रकार, हवामान आणि समस्या लक्षात घेऊन प्रोडक्ट्स निवडणे महत्त्वाचे आहे.
Glass Skin मिळवण्यासाठी 10 स्टेप्स करणे आवश्यक नाही. जास्त उत्पादने एकावर एक लावल्याने विशेषतः उष्ण आणि दमट हवामानात पोर्स ब्लॉक होणे, तेलकटपणा किंवा irritation वाढू शकते.
Hydrating toner, essence, hyaluronic acid आणि ceramide-based moisturiser यांसारखी उत्पादने त्वचेचा moisture barrier मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात.
भारतीय त्वचेत pigmentation, tanning आणि acne marksची समस्या तुलनेने सामान्य आहे. त्यामुळे केवळ glow देणाऱ्या प्रोडक्ट्सपेक्षा niacinamide, vitamin C किंवा azelaic acidसारखे ingredients गरजेनुसार निवडणे फायदेशीर ठरू शकते.
Glass Skinसाठी कितीही serum किंवा cream वापरली तरी sunscreen विसरू नका. भारतीय हवामानात UV exposureमुळे tanning आणि pigmentation वाढू शकते. रोज broad-spectrum sunscreen वापरणे महत्त्वाचे आहे.
K-Beauty प्रोडक्ट viral आहे म्हणून ते तुमच्या त्वचेला नक्कीच सूट होईल असे नाही. विशेषतः sensitive किंवा acne-prone skin असल्यास नवीन प्रोडक्ट हळूहळू सुरू करा आणि आधी patch test करा.
फिल्टर किंवा सोशल मीडियावरील परफेक्ट त्वचा पाहून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. Gentle cleanser, moisturiser, sunscreen आणि गरजेनुसार योग्य treatment हीच चांगल्या skincareची बेसिक सुरुवात आहे. त्वचेची समस्या कायम असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.