दैनिक गोमन्तक
उन्हाळा सुरु झाला कि आपल्याला थंड खायला-प्यायला हवे असते. ताक, लस्सी, लिंबाचा सरबत, उसाचा रस याप्रमाणेच आणखी पेयाला मोठी मागणी असते ते पेय म्हणजे कोकम सरबत होय.
उन्हाळ्यात कोकम सरबत पिण्याचा सल्लादेखील जातो. याचे कारण म्हणजे कोकम मध्ये नैसर्गिक थंडपणाचा गुणधर्म असतो.
ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून या सरबताचे सेवन करायलाच हवे.
याबरोबरच, कोकम सरबतामुळे तुमची त्वचा उत्तम राहते,
हे सरबताचे सेवन केल्याने तुम्हाला तुमचे पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे तुम्ही सतत खात नाही त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
कोकम सरबताचे सेवन केल्याने तुमचे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते, कॅन्सरचा धोका कमी होतो.
महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही ताण-तणाव किंवा नैराश्याचा सामना करत असाल तर त्यातून बाहेर पडण्यास मदत होते.