Akshay Nirmale
रोशनी नाडर मल्होत्रा (Roshani Nadar Malhotra) या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. उद्योगपती शिव नाडर आणि किरण नाडर या दाम्पत्याची रोशनी ही एकुलती एक मुलगी आहे.
रोशनी यांची संपत्ती 84 हजार 300 कोटी रूपये इतकी आहे.
HCL या कंपनीच्या त्या चेअरपर्सन असून कंपनीचे बाजारमुल्य 3 लाख कोटी रूपये आहे. एचसीएलची स्थापना शिव नाडर यांनी 1976 मध्ये केली.
रोशनी यांनी नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी कम्युनिकेशनची पदवी घेतली आहे. याशिवाय केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए देखील झाल्या आहेत.
रोशनी यांनी अॅनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी या चॅनेल्ससाठी The Brink नावाची सीरीज बनवली. त्यातील वटवाघुळावरील भागाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी हल्का नावाचा बालचित्रपटही बनवला आहे.
रोशनी यांच्या पतीचे नाव शिखर मल्होत्रा असे आहे. शिखर एचसीएल हेल्थचे उपाध्यक्ष आहेत.
2009 मध्ये त्यांचे लग्न झाले. रोशनी आणि शिखर यांना 2 अपत्ये आहेत.