Pranali Kodre
आयपीएल 2023 मध्ये 9 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सकडून रिंकू सिंगने गुजरात टायन्स विरुद्ध अखेरच्या षटकात सलग 5 षटकार मारले.
त्याच्या या षटकारांमुळे कोलकाता नाईट रायडर्सने विजय देखील मिळवला.
दरम्यान आयपीएलमध्ये एका षटकात 5 षटकार मारण्याची ही पाचवी वेळ होती.
यापूर्वी पहिल्यांदा असा पराक्रम ख्रिस गेलने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध 2012 साली बंगळुरूमध्ये राहुल शर्माच्या षटकात केला होता.
त्यानंतर 2020 साली राहुल तेवतियाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पंजाब किंग्सविरुद्ध शारजाहमध्ये शेल्डन कॉट्रेलच्या षटकात 5 षटकार मारले होते.
तसेच 2021 आयपीएलमध्ये रविंद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा गोलंदाज हर्षल पटेलविरुद्ध एकाच षटकात 5 षटकार खेचले होते.
2022 आयपीएलमधील लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पुण्यात झालेल्या सामन्यात शिवम मावीविरुद्ध मार्कस स्टॉयनिस आणि जेसन होल्डर या दोघांनी मिळून एकाच षटकात 5 षटकार मारले होते.
त्यानंतर आता असा विक्रम रिंकू सिंगनेही करून दाखवला आहे.