Akshay Nirmale
एस. जयशंकर म्हणाले की, दहशतवादाबाबत पाकिस्तानचे धोरण कायमच दुटप्पी राहिले असून त्यांची विश्वासार्हता संपली आहे.
एकीकडे दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचे आणि दुसरीकडे शांततेच्या गप्पा करायच्या हे चालणार नाही. हे थांबले पाहिजे.
दहशतवाद आणि शांतता एकत्रितपणे नांदू शकत नाहीत. पाकिस्तानने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर अशी भूमिका मांडली आहे. आता गोव्यातूनही ती भूमिका पाकने मांडली.
कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. सर्व प्रकारांतील दहशतवाद संपवला पाहिजे.
दहशतवादाची आर्थिक रसद रोखण्यासाठीही प्रभावी कारवाई आवश्यक आहे.
पाकिस्तानचे अंतिम लक्ष्य शांतता आहे की नाही हे माहीत नाही; पण दहशतवाद अंतिम लक्ष्य कधीच साध्य होणार नाही, असेही जयशंकर म्हणाले.
भारत आणि चीन सीमेवर परिस्थिती सुरळीत नाही. सीमाभागात वारंवार घुसखोरी होत आहे. ही परिस्थिती सुधारणे दोन्ही देशांसाठी हिताचे आहे.