Pranali Kodre
नो बॉल टाकणे ही कोणत्याही गोलंदाजासाठी निराशाजनक गोष्ट असते.
काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचा गोलंदाज तुषार देशपांडेने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना 3 नो-बॉल टाकले होते.
पण आयपीएलमध्ये कोणत्या गोलंदाजाने 6 एप्रिल 2023 पर्यंत सर्वाधिक नो बॉल टाकलेत याचा आढावा घेऊ.
आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा नकोसा विक्रम मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहच्या नावावर आहे. त्याने 28 नो-बॉल टाकले आहेत.
तसेच या यादीत 24 नो-बॉलसह उमेश यादव आहे.
तिसऱ्या क्रमांकावर एस श्रीसंत असून त्याने 23 नो-बॉल टाकले आहेत.
अमित मिश्रा आणि इशांत शर्मा संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर असून या दोघांनी प्रत्येकी 21 नो-बॉल टाकले आहेत.
तसेच यानंतर लसिथ मलिंगाचे नाव येत असून त्याने 18 नो-बॉल टाकले आहेत.
प्रसिद्ध कृष्णा सहाव्या क्रमांकावर असून त्याने 17 नो-बॉल टाकले आहेत.