Pranali Kodre
आयपीएल म्हटले की चौकार - षटकारांची बरसात हमखास पाहायला मिळते.
गेल्या काही हंगामापासून तर दरवर्षी आयपीएलमध्ये जवळपास 500-1000 च्या आसपास षटकार मारले जातात.
काही खेळाडू असेही आहेत, ज्यांनी 100-120 मीटरपेक्षाही लांब षटकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम एल्बी मॉर्केलने केला असून त्याने 2008 आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध प्रज्ञान ओझाच्या गोलंदाजीवर 125 मीटरचा षटकार मारला होता.
त्यानंतर प्रविण कुमार असून त्यानेही 2008 आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना राजस्थान रॉयल्सच्या युसूफ पठाणविरुद्ध 124 मीटर लांब षटकार ठोकलेला.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऍडम गिलख्रिस्ट असून त्याने 2011 आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळताना आरसीबीचा वेगवान गोलंदाज चार्ल लँगवेल्ड.विरुद्ध 122 मीटर लांब षटकार मारला होता.
रॉबिन उथप्पा या यादीत चौथ्या क्रमांकावर असून त्याने 2010 आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी खेळताना त्यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ड्वेन ब्रावो विरुद्ध 120 मीटरचा षटकार मारला होता.
या यादीत पाचव्या क्रमांकावर ख्रिस गेल, युवराज सिंग आणि रॉस टेलर हे तीन खेळाडू आहेत.
गेल, युवराज आणि टेलर या तिघांनीही प्रत्येकी 119 मीटर लांब षटकार मारला आहे.